देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या बिहारमध्ये समोर आलेले असून पतीसोबत दार्जिलिंग इथे हनिमूनला जात असताना रेल्वेतून चक्क पत्नी बेपत्ता झालेली आहे. किशनगंज रेल्वे स्थानकावर ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून वॉशरूममध्ये ही महिला गेलेली होती मात्र त्यानंतर ती पुन्हा आली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील काहीही आढळून आलेले नाही.
उपलब्ध माहितीनुसार , प्रिन्सकुमार असे या पतीचे नाव असून तो वीजखात्यात नोकरीला आहे. 22 फेब्रुवारी रोजी त्याचा विवाह मधुबनी येथील काजल कुमारी या तरुणीसोबत मोठ्या धुमधडाक्यात झालेला होता. 27 जुलै रोजी दोघे दार्जिलिंग आणि सिक्कीम येथे फिरण्यासाठी निघाले त्यावेळी एसी कोचमधील दोन जागा त्यांनी आरक्षित केलेल्या होत्या.
28 जुलै रोजी रेल्वे किशनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचली त्यावेळी आपली पत्नी गायब असल्याचे या पतीच्या लक्षात आले त्याने तिला फोन केला मात्र तिचा मोबाईल देखील यावेळी बंद आढळून आला. त्याने त्यानंतर तिच्या माहेरच्या व्यक्तींना या प्रकरणी कल्पना दिली आणि सर्वजण किशनगंजला पोहोचले आणि तिचा शोध घेऊ लागले . वृत्त लिहीपर्यंत ती आढळून आलेली नाही मात्र हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.