महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावतीत समोर आलेली असून फेसबुकवर झालेल्या ओळखीतून एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत एका विधवा महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. पीडित महिलेचे वय 29 वर्ष असून 29 जुलै रोजी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राहुल भानुदास तायडे ( राहणार चिंचोली शिंगणे ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याची तक्रारदार महिलेसोबत 2021 मध्ये फेसबुकवर ओळख झालेली होती त्यानंतर त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले आणि त्यानंतर संपर्कात राहू लागले. महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर महिला एकाकी होती तिला आधाराची गरज असल्याकारणाने आरोपी राहुल याने तिच्यासोबत लग्न करेल असे तिला आश्वासन दिले आणि वारंवार तिच्यासोबत त्याआधीच शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पीडित महिलेने अनेकदा त्याला लग्नासाठी तगादा लावला मात्र त्याने झाले गेले विसरून जा तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला त्यावर महिलेने त्याला तू माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी पोलिसात जाईल अशी देखील त्याला धमकी दिली त्यावेळी त्याने जर तू असे केले तर तुझ्या आई-वडिलांना मी मारून टाकीन अशी देखील धमकी दिली. पीडित महिला अखेर घाबरून काही दिवस गप्प बसली आणि अखेर 29 जुलै रोजी तिने पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.