पतीसमोरच केला होता त्याच्या पत्नीवर बलात्कार , पुणे पोलिसांनी काढली धिंड

Spread the love

देशात एक महाराष्ट्रात एक शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एका पतीसमोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी हा अमानुष गुन्हा करणाऱ्या व्यक्तीची भर पावसात धिंड काढलेली आहे . पुणे पोलिसांच्या या दणक्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार, इम्तियाज हाशिम शेख ( वय 47 राहणार म्हाडा कॉलनी हडपसर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बोपखेल येथील 34 वर्षीय महिलेने हडपसर पोलिसात तक्रार दिलेली होती. उसने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवत अक्षरशः त्याच्यासमोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडलेला होता. गुरुवारी भरपावसात पोलिसांनी त्याची धिंड काढलेली आहे.

इम्तियाज शेख हा मसाले विक्रेता असून त्याने फिर्यादी महिलेच्या पतीला चाळीस हजार रुपये उसने दिलेले होते ते हा व्यक्ती परत करू शकला नाही म्हणून फेब्रुवारी 2023 मध्ये इम्तियाज याने तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगरी इथे बोलावून घेतले आणि पतीला स्वतः समोर बसून चाकूचा धाक दाखवत चक्क पतीसमोरच या महिलेवर बलात्कार केलेला होता.

काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा याच कारणातून आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली त्याला पीडित महिलेने स्पष्टपणे नाकार दिला त्याने त्याच्या घरामधील याआधी झालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे चित्रीकरण दाखवत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची देखील तिला धमकी दिलेली होती आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचले. पुणे पोलिसांनी भर पावसात त्याची रस्त्यावरून धिंड काढलेली असून पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.


Spread the love