महाराष्ट्रात एक अत्यंत संतापजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून 65 वर्षीय व्यक्तीने चक्क स्वतःच्या नातीवर अत्याचार केला आणि त्यानंतर ही घटना कोणाला सांगू नको नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. प्रकरण समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर या वृद्धाला अटक करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील एका गावात ही घटना घडलेली असून उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेला सुट्टी असताना पीडित अल्पवयीन मुलगी घरामध्ये असताना नराधम आजोबाने तिच्यासोबत हा प्रकार केला . तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर आईने तिला विश्वासात घेत माहिती विचारली त्यावेळी तिने आजोबांनी जबरदस्तीने अनेकदा हा प्रकार केल्याचे आईला सांगितले . मुलीच्या आईने पतीला सोबत घेत करमाळा पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवलेली आहे.