कोरोना काळातील दंडाची रक्कम पोलिसानेच हडपली , गुन्हा दाखल

Spread the love

पोलीस दलाला काळीमा फासणारा एक प्रकार धाराशिव जिल्ह्यात समोर आलेला असून कोरोना काळात दंडात्मक कारवाई म्हणून करण्यात आलेल्या तब्बल सहा लाख 78 हजार रुपयांचा एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अपहार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. 29 जुलै रोजी धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रवीण गणपतराव तावशीकर असे पोलीस हवालदाराचे नाव असून ते आनंदनगर पोलीस ठाण्यातच कॅश मोहरर या पदावर 13 नोव्हेंबर 2020 पासून 27 जानेवारी 2023 पर्यंत कोरोना काळात केलेल्या दंडात्मक कारवाईच्या जबाबदार पदावर कार्यरत होते. दरम्यानच्या काळात आकारलेल्या सहा लाख 78 हजार 365 रुपयांची त्यांनी शासकीय दस्तात नोंद केली नाही किंवा ही रक्कम बँकेतही भरली नाही.

सदर रक्कम त्यांनी सर्व स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ रोहिदास खरड यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केलेली असून भारतीय दंड विधान ४२०, ४०९ अंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love