पोलिसांच्या लॉकअपमध्ये कैद्याचा मृत्यू , कुटुंबीयांकडून मृत्यूवर शंका

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या मुंबईतील बोरिवली परिसरात समोर आलेले असून पुण्यातून त्याला ताब्यात घेण्यात आलेले होते आणि बोरिवली जनरल लॉकअपमध्ये अंडरवेअरच्या इलास्टिकचा वापर करत त्याने गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे मात्र या प्रकरणी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी शंका उपस्थित केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दीपक जाधव हा बोरिवली पश्चिमच्या डॉन बॉस्को शाळेजवळ रामचंद्र भंडारी चाळीत राहत होता. त्याच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर 28 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दीपक जाधव याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले होते.

दीपक यांचे भाऊ तानाजी जाधव यांनी याप्रकरणी पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेला असून आपल्या भावाला पोलिसांनी छळ करून मारले असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी त्याला जामीन मिळणार होता मात्र त्याआधीच आम्हाला त्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना आम्ही अधिक विचारले असता त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली.

हॉस्पिटल पोलीस ठाणे आणि तुरुंग इथे आम्हाला फिरवले असेच म्हणत भावाचा मृतदेह देखील पोलिसांनी परस्पर शवविच्छेदनासाठी पाठवला त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. पोलिसांकडून मात्र या प्रकरणावर बोलताना आम्ही संबंधित कोर्टापुढे आरोपीला सादर करून त्याचा जामीन घेतलेला होता त्याचा ताबा घेतलेला होता त्यामुळे या घटनेप्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत असे म्हटलेले आहे.


Spread the love