आयसिससाठी भरती ? , पुण्यातून ‘ तो ‘ डॉक्टर ताब्यात

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात हडपसर भागातील नामवंत वैद्यकीय रुग्णालयात काम करणारा भुलतज्ञ डॉक्टर अदनान अली सरकार हा आयसिसच्या महाराष्ट्र मॉडेलचा भाग असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आलेली असून तरुणांची माथी भडकवत त्यांना आयसिसमध्ये भरती करण्याचे काम करत असल्याचा दावा एनआयएने केलेला आहे .

एनआयएने डॉक्टर सरकारच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून त्याला गुरुवारी अटक केली त्यावेळी त्याच्या घरातून लॅपटॉप , हार्डडिस्क, सिम कार्ड आणि आयसिससंदर्भात काही कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहेत असे एनआयएचे म्हणणे आहे. हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात तो भुलतज्ञ म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असून पुण्यातील एका मेडिकल कॉलेजमधून त्याने अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.

एनआयएने सध्या महाराष्ट्र मोड्यूल प्रकरणी मुंबई ठाणे अन पुण्यातून आतापर्यंत ताबीज नाशिरस सिद्दिकी , जुबेर नूर मोहम्मद शेख ,अबू नसेबा, सरजील शेख आणि जुल्फिकार आली बडोदा वाला यांना अटक केलेली आहे. एनआयए कोठडीमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी ते या डॉक्टराच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. आरोपी डॉक्टर हा दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी तरुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता असे यंत्रणेचे म्हणणे आहे.


Spread the love