शिक्षण सोडून दे नाहीतर तुझे फोटो.., पुण्यात शिक्षणासाठी आली अन ..

Spread the love

एक खळबळजनक असा प्रकार सध्या समोर आलेला असून पुण्यात शिक्षण घेतलेल्या एका युवतीची एका तरुणाने फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत. आरोपीने तिच्यासोबत मैत्री केली आणि त्यानंतर एका हॉटेलमध्ये नेऊन तिचे काही आक्षेपार्य फोटो काढले आणि ब्लॅकमेल करण्यास सुरू केले . शिक्षण सोडून दे नाहीतर फोटो व्हायरल करेल अशी देखील तो धमकी देत होता.

उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलीचे वय 19 वर्ष असून इंस्टाग्रामवर तीची इमरान शकील अब्बासी या तरुणासोबत 2020 मध्ये मैत्री झालेली होती. सदर युवक हा मध्यप्रदेशातील रतलाम येथील असून हळूहळू त्यांच्यात फोनवर बोलणे सुरू झाले त्यानंतर दोघे एकाच शहरातील निघाले. त्यानंतर इमरान याने या तरुणीसोबत आणखीन जवळीक निर्माण करण्यास सुरुवात केली.

2022 मध्ये जुलै महिन्यात या तरुणीचा वाढदिवस होता त्यावेळी ती गुजरातमधील बडोदा येथे परीक्षा देण्यासाठी गेली त्यावेळी आरोपी देखील तिथे दाखल झाला त्यानंतर दोघे एकाच हॉटेलमध्ये थांबले . ऑगस्ट 2022 मध्ये तरुणी पुन्हा पुणे शहरात आली त्यानंतर इम्रान याने तिला इतर मुलांशी तू बोलत जाऊ नको तुझे शिक्षण देखील सोडून दे असे म्हणायला सुरुवात केली. तरुणीने विरोध केला त्यावेळी त्याने तिला तिचे फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्यास सुरू केले.

इमरान याच्याकडून सातत्याने अशाच पद्धतीचा त्रास होत असल्याने जानेवारी 2023 मध्ये तिने अखेर त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला त्यानंतर इम्रान तिच्या घरी पोहोचला आणि तिच्या कुटुंबीयांना देखील धमकी देऊ लागला. श्रेया सिंग नावाने त्याने खोटे अकाउंट देखील तयार केले आणि त्यावर दोघांचे काही फोटो टाकण्याची देखील तो धमकी देत होता त्यानंतर तरुणीने रतलाममधील पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे .


Spread the love