देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेल्या असून एका व्यापाऱ्याकडून मालाची पोहोच मिळाली नाही म्हणून दिल्लीतील व्यापाऱ्याने मुंबईमधील एका एजंट व्यक्तीला धमकावत त्याच्या वडिलांकडून 13 लाख 15 हजार रुपयांची खंडणी उकळलेली आहे. दिल्लीतील एका व्यापाऱ्याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , कुणाल गुलाटी असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका 34 वर्षीय एजंट याच्या वडिलांकडून 13 लाख 15 हजार रुपयांची आरोपीने खंडणी उकळण्याचा दावा तक्रारदार व्यक्ती यांच्याकडून करण्यात येत आहे. आरोपीने त्यांना घरी आणि कार्यालयात येऊन मारण्याची देखील जीवे मारण्याची देखील धमकी दिलेली आहे.
दिल्लीतील व्यापारी कुणाल गुलाटी याच्यासोबत 2020 मध्ये तक्रारदार व्यक्ती यांची ओळख झाली होती त्यानंतर गुलाटी याने तक्रारदार यांच्या वडिलांना फोन करून दुबईवरून प्रोटीन मागवायचे असल्याबद्दल सांगितले. तक्रारदार यांचे वडील त्यावेळी उत्तर प्रदेशात होते म्हणून त्यांनी राकेश भानुषाली आणि अनिल भानुषाली यांच्यासोबत गुलाटी यांची ओळख करून दिली होती.
कुणाल गुलाटी यांनी त्यानंतर राकेश आणि अनिल भानुषाली यांना दुबईवरून आपला माल दिल्ली येथे पोहोचवण्याची जबाबदारी दिली मात्र दुबईतील एजाज नावाच्या एका व्यक्तीचे पैसे देणे असल्याकारणाने त्याने हा माल विकून टाकला म्हणून रागात आरोपीने तक्रारदार याच्या वडिलांना जबाबदार धरले आणि त्यांना धमकावणे सुरू केलेले होते त्यानंतर अखेर पोलिसात प्रकरण पोहोचलेले आहे.