‘ मी तसा नाही ‘ तरुणाने म्हटल्याचा राग आला अन त्यानंतर..

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण नवी दिल्ली इथे समोर आलेले असून मी तसा नाही असे म्हटल्यानंतर राग आल्याने एका मित्राने एका व्यक्तीने समलिंगी संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या एका तरुणाचा गोळ्या झाडून खून केलेला आहे. दिल्लीतील आंबेडकर नगर इथे ही घटना घडलेली असून आरोपीने त्यानंतर या तरुणाच्या घरच्यांना फोन करून वीस लाख रुपयांची खंडणी देखील मागितली.

उपलब्ध माहितीनुसार, शशांक सिंग ( वय सत्तावीस ) असे याप्रकरणी आरोपीचे नाव असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कार आणि पिस्तूल देखील जप्त करण्यात आलेले असून मयत व्यक्तीचा मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून आरोपीने एका नाल्यात फेकून दिलेला होता त्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत त्याला अटक करण्यात आलेली असून प्रकरणाची सखोल चौकशी दिल्ली दक्षिण दिल्ली पोलीस करत आहेत.


Spread the love