पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर समोर आलेला असून दिल्लीला जाण्यासाठी आलेल्या एका आजीबाईंनी ‘ माझ्या सर्व बाजूला बॉम्ब लावलेले आहेत ‘ असे म्हणत सीआयएसएफच्या जवानांची चांगलीच धावपळ घडवून आणलेली आहे अखेर पोलिसांनी या आजीबाईंना ताब्यात घेतलेले असून विमानतळ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नीता प्रकाश कृपलानी ( वय 72 वर्ष राहणार गुडगाव औद्योगिक वसाहत ) असे अटक करण्यात आलेल्या आजीबाईंचे नाव असून त्यांच्या विरोधात महिला पोलीस शिपाई दिपाली बबनराव झावरे ( वय 30 राहणार लोहगाव ) यांनी तक्रार दिलेली आहे.
तीन ऑगस्ट रोजी आरोपी महिला लोहगाव विमानतळावर आलेल्या असताना त्यांनी सीआयएसएफच्या जवानांना माझ्या सर्व बाजूंनी बॉम्ब लावलेले आहेत असे सांगितले त्यामुळे जवान देखील घाबरून गेले मात्र त्यांनी परिस्थितीचे भान ठेवत महिलेला ताब्यात घेतले त्यावेळी असा कुठलाही प्रकार नसल्याचे लक्षात आल्यानंतर या आजीबाईंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी असा प्रकार का केला याचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.