सोशल मीडियावर फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आलेला असून नागपूर इथे फ्रीज आणि सोफा विकायचा आहे अशी जाहिरात ओएलएक्सला टाकणे एका महिलेला चांगलेच महागात पडलेले आहे. सायबर गुन्हेगाराने या प्रकरणात महिलेच्या खात्यातील पाच लाख दहा हजार रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात वळवून महिलेची फसवणूक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, स्मिता ( वय ३५ राहणार ) असे महिलेचे नाव असून त्यांना त्यांच्या घरातील जुने फर्निचर आणि सोफा विकायचा होता म्हणून त्यांनी 27 जुलै रोजी दुपारी ओएलएक्सला जाहिरात टाकली त्यानंतर त्यांना एका नंबरवरून फोन आला त्यावेळी समोरील व्यक्तीने मला तुमचा सोफा आवडलेला आहे असे सांगितले त्यानंतर आरोपीने पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला आणि मी तुम्हाला फोन पेच्या माध्यमातून पैसे पाठवतो तुम्ही मला साठ रुपये पाठवा असे सांगितले त्यानुसार महिलेने त्याला 60 रुपये पाठवले.
सदर प्रकारात महिलेला काय होते आहे याचा अंदाज आला नाही मात्र त्यावेळी आरोपीने त्यांच्या खात्यातून एक लाख एक हजार 99 रुपये काढून घेतले. पैसे गेल्याचे समजल्यानंतर त्यांनी पुन्हा आरोपीला फोन करून पैसे परत मागितले त्यावेळी आरोपीने 9 हजार रुपये पाठवले तर पूर्ण पैसे परत करतो असे म्हणाला म्हणून महिलेने पुन्हा नऊ हजार रुपये पाठवले त्यावेळी आरोपीने अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भुलथापा देत त्यांच्या खात्यातून तब्बल पाच लाख दहा हजार रुपये काढून घेतलेले आहेत. बजाजनगर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.