पुणे शहरात एक वेगळीच घटना उघडकीस आली असून चक्क गर्लफ्रेंडला गिफ्ट देऊन खुश ठेवता यावे यासाठी ज्वेलरीच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही चोर हे उच्चशिक्षित असून डॉक्टरकीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. पुणे शहरात हडपसर आणि कोथरूडमधील ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याच्या अंगठ्या चोरताना हे पकडले गेले आहेत. दोघेही आपापल्या मैत्रिणींना खुश ठेवण्यासाठी चोऱ्या करून गिफ्ट देण्याचा प्रयत्न करत होते.
उपलब्ध माहितीनुसार, अनिकेत हणमंत रोकडे (वय २३, मूळचा लातूर) आणि वैभव संजय जगताप (वय २२, मूळचा वाशीम) अशी या प्रकरणातील २ आरोपींची नावे आहेत. ते बीएएमएस आणि बीएससी नर्सिंग शाखेच्या तिसर्या वर्षात एक नामांकित संस्थेत शिकत आहेत .हडपसर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात ८ डिसेंबरला दुपारच्या वेळी चोरी करण्यात आली होती तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते.
दोन्ही आरोपी व्यसनाधीन आहेत. त्यांच्याकडे मैत्रिणीला गिफ्ट द्यायला पैसे नव्हते. त्यामुळे दोघांनी चोरी करण्याचं ठरविले. त्यानुसार दोघांनी हडपसर आणि कोथरूड येथील ज्वेलरीच्या दुकानात चोरी करण्याचे ठरविले. चोरीची पद्धत देखील काहीशी वेगळीच होती त्याप्रमाणे दोघांपैकी एक जण आतमध्ये जायचा आणि दुसरा बाहेर असलेला साथीदार दुचाकी चालू करून त्याची वाट पाहत बसायचा.आतमधील आरोपी अंगठी खरेदी करायची आहे म्हणून पहायला घ्यायचा अन अन धूम ठोकायचा अन दुचाकीवर बसून फरार व्हायचा. दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये आरोपींनी अंदाजे ३६ ग्रॅम वजनाच्या ४ अंगठ्या चोरल्या आहेत.