शेतकरी बांधवांनो सावधान..मावळमध्ये शेतकऱ्याने गमावलेत प्राण

Spread the love

पुणे जिल्ह्यात सध्या पावसाचे वातावरण असून अनेक शेतकरी बांधव सध्या शेतीची कामे करत आहेत मात्र शेतात गवत काढताना अंगावर विद्युत तार पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मावळ तालुक्यातील कांब्रे नामा गावात ही घटना घडलेली असून एका शेतकऱ्याने यात प्राण गमावलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , श्रीकांत गणपत गायकवाड ( वय 33 वर्ष राहणार कांब्रे नामा तालुका मावळ जिल्हा पुणे ) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात भातातील गवत काढत होते त्यावेळी त्यांच्या अंगावर विद्युत वाहिनी तुटून पडली आणि शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतात त्यांच्या शेजारी काम करणाऱ्या एका व्यक्तीने ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केलेला आहे.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक दुर्घटना घडत असून सदर शेतकऱ्याच्या मृत्यूला महावितरण कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलेला आहे. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही पूर्णपणे मदत करू असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.


Spread the love