‘ नासा ‘ मध्ये मी ज्युनिअर सायंटिस्ट , खुनाच्या प्रकरणात झाला गजाआड

Spread the love

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून देणाऱ्या नागपूर येथील दोन व्यावसायिकांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला ओमकार महेंद्र तलमले हा कोंढारी दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आलेली असून याआधी देखील त्याने आपण नासाचे शास्त्रज्ञ आहोत असे सांगत तब्बल 111 बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्याचे आमिष दाखवत पाच कोटी 31 लाख रुपयांची त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 25 जुलै 2023 रोजी ओमकार याने पैशाचे आमिष दाखवत कोंढाळी इथे काही गुंडांच्या मदतीने नागपूर येथील दोन व्यावसायिक मित्रांचे अपहरण केलेले होते त्यानंतर त्यांचे खून करून मृतदेह वर्धा जिल्ह्यातील एका नदीत फेकून देण्यात आलेले होते. ओमकार याला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याचे नाव या प्रकरणात आल्यानंतर तरुणांनी हिम्मत एकवटली आणि नागपूर शहर पोलिसात त्याची तक्रार केलेली आहे.

ओमकार याने अनेक तरुणांना बनावट नियुक्तीपत्र देखील पाठवलेली होती. नासाच्या नावाखाली त्याने हा प्रकार केल्याची माहिती आहे . मनीषनगर जय दुर्गा सोसायटी येथील एका अपार्टमेंटमधील रहिवासी अश्विन अरविंद वानखेडे आणि ओमकार तलमले हे एका ढोल ताशा पथकात कार्यरत असल्याने त्यांची ओळख झालेली होती त्यावेळी ओमकार याने आपण नासामध्ये ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून काम करत आहे असे सांगितले होते.

ओमकार याच्यावर तक्रारदार व्यक्तींचा विश्वास बसलेला होता त्यावेळी त्याने रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये अनेक जागा खाली आहेत. तिथे अधिकाऱ्यांशी आपली ओळख आहे असे सांगत अनेक जणांकडून पैसे जमा केलेले होते आणि ईमेलवर बनावट नियुक्तीपत्रे देखील पाठवलेली होतीकामावर रुजू होण्यासाठी तरुण गेले त्यावेळी हा कोण ओंकार आहे याची आम्हालाच माहिती नाही अशी उत्तर मिळाल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला होता त्यानंतर सर्व पीडित बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन अखेर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.


Spread the love