देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण हैदराबाद इथे समोर आलेले असून महिला सुरक्षेचा प्रश्न देशात किती गंभीर झालेला आहे हे पुन्हा एकदा या प्रकरणानंतर समोर आलेले आहे. जवाहर नगर भागात एका व्यक्तीने तरुणीला चक्क रस्त्यावर विवस्त्र केलेले असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची आई देखील त्यावेळी त्याच्यासोबत होती. संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रविवारी रात्री आठच्या सुमारास पीडित महिला कपड्याच्या दुकानातून घरी परतत होती त्यावेळी आरोपी तिथे आला आणि महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरू केले . महिलेने विरोध केल्यानंतर आरोपी आक्रमक झाला त्याने तिचे कपडे फाडून रस्त्यावर तिला नग्न केले त्याचवेळी दुचाकीवरून जाणारी एक महिला तिथे थांबली आणि तिने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. पेड्डारामह असे आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर परिसरातील काही महिलांनी पीडित महिलेला निळ्या रंगाच्या प्लास्टिक कागदाने गुंडाळून घेतले . धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या आईने देखील त्याला रोखण्याची किंवा समोरील महिलेचा बचाव करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही . आरोपींच्या विरोधात विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.