माझी मुलं स्वर्गात सुरक्षित , महिलेने पोटच्या मुलांची केली हत्या

Spread the love

एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण अमेरिकेत समोर आलेले असून इडाहो शहरात एक विचित्र घटना घडलेली असून यात महिलेने आपल्याला ईश्वरी आज्ञा आहे असे म्हणत स्वतःच्याच दोन मुलांची अमानुषपणे हत्या केलेले आहे. आरोपी महिलेला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

लोरी वेलोबेबेल असे या महिलेचे नाव असून तिने तिची सोळा वर्षाची मुलगी टायली आणि सात वर्षांचा मुलगा जोशवा यांची हत्या केली होती. सदर महिला ही मनोरुग्ण असून जगाचा अंत जवळ येत आहे त्यामुळे मला आणि माझ्या मुलाला आणि मुलींना सुरक्षित ठेवायचे होते. ते दोघे आता स्वर्गात सुरक्षित असून मी त्यांच्याशी सतत बोलत राहते. देवाने मला तसे करण्याची आज्ञा दिलेली होती असे देखील तिने म्हटलेले आहे. अमेरिकेसारख्या देशात ही घटना समोर आल्यानंतर अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर गेलेली आहेत हे देखील समोर आलेले आहे.


Spread the love