सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून छत्तीसगड येथील हे प्रकरण आहे . येथील एका गावात प्रियकर प्रेयसीचा एक हाय व्होल्टेज ड्रामा समोर आलेला असून प्रियकरावर चिडलेली प्रेयसी संताप व्यक्त करण्यासाठी सुमारे दीडशे फूट उंच खांबावर चढलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे तिचे मन वळवण्यासाठी हा प्रियकर देखील याच खांबावर चढून तिची समजूत काढत होता.
उपलब्ध माहितीनुसार, अनिता भैना असे या महिलेचे नाव असून नवापूर गावातील ती रहिवासी आहे. दोन दिवसांपासून ती तिचा प्रियकर असलेला मुकेश याच्या घरी राहत होती. दोघांमध्ये गुरुवारी किरकोळ वाद झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि विजेच्या टावरवर जाऊन चढून बसली . तिचा प्रियकर तिच्यामागे धावला मात्र ती तोपर्यंत टॉवरवर चढून ठाण मांडून बसलेली होती.
मुकेश याने तिला खालून आवाज देत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती म्हणून अखेर तो देखील त्या टावरवर चढला आणि तिची समजूत काढू लागला. सुमारे अर्धा तास त्यांच्या संभाषण सुरू होते मात्र दरम्यानच्या काळात या प्रकरणाची पोलिसांना खबर देण्यात आली आणि पोलिसांनी दोघांनाही खाली उतरून पोलीस ठाण्यात नेले आणि अनिता हिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
अनिता ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहते गेल्या. काही दिवसांपासून तिचे मुकेश याच्यासोबत प्रेमसंबंध जुळलेले होते आणि त्यानंतर ती दोन दिवसांपासून त्याच्याकडे राहायला देखील आलेली होती. त्यांच्यात वाद झाल्यानंतर तिने हा प्रकार केल्याची चर्चा असून प्राथमिक माहिती असून गर्दीतील कोणीतरी या प्रकरणाचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियात व्हायरल करून दिला.