शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार मांजरी परिसरात समोर आलेला असून एका व्यक्तीने एका मुलीला तुला चित्रपटात हिरोईन बनवतो असे सांगत तिच्यावर बलात्कार केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी व्यक्ती हा नृत्यशिक्षक म्हणून काम करतो तर पीडित मुलगी हिच्यासोबत त्याची मॉडेलिंगच्या बहाण्याने ओळख झालेली होती.
उपलब्ध माहितीनुसार , सुशील राजेंद्र कदम ( वय 32 राहणार गोपाळपट्टी चौक मांजरी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात एका पंधरा वर्षांच्या मुलीने हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे. सासवड परिसरातील गावातील एका लॉजवर जुलै 2023 मध्ये हा प्रकार घडलेला असून फिर्यादी मुलगी ही एका डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकत होती. आरोपी तिथे नृत्य शिक्षक म्हणून काम करायचा होता त्यावेळी त्यांची ओळख झाली .
त्याने तिला हीरोइन बनवण्याचे आमिष दाखवले होते. फर्स्ट लूकसाठी तू मला भेट असे म्हणत आरोपी तिला एका लॉजवर घेऊन गेला. तिने आरोपीला तुम्ही मला इथे का आणले असे विचारले असता त्याने तिच्या आई-वडिलांना ठार करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला असे देखील तिने म्हटलेले आहे.