मिरवणुकीत नाचणाऱ्या महिलांकडे खंडणी मागितली , तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापूर जिल्ह्यात समोर आलेला असून वर्गणीसाठी गोळा केलेल्या पैशातील 50000 रुपये गुपचूप द्या नाहीतर काढलेले व्हिडिओ आणि शूटिंग सर्वत्र व्हायरल करून देऊ अशी धमकी देत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बार्शीतील तीन जणांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , राज नानावटी , दिनकर काटकर ( दोघेही राहणार बार्शी ) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात खंडणी विनयभंग करण्याच्या उद्देशाने भाषा वापरणे आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दोन ऑगस्ट रोजी बार्शी शहरात मिरवणूक सुरू असताना त्यातील काही फिर्यादी महिला मिरवणुकीत नृत्य करत असताना आरोपीपैकी एकाने अशाच पद्धतीने तुम्ही अनेक जणांकडून वर्गणी गोळा केलेली आहे. त्यातील पन्नास हजार रुपये आम्हाला द्या नाहीतर तुमचे डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करून देऊ अशी धमकी महिलांना देण्यात आलेली होती. महिलांसह अनेक कार्यकर्त्यांनी यानंतर पोलिसात येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केलेली होती त्यानंतर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love