तरुणीने तुरुंगातून ‘ डायरेक्ट ‘ गाठला नेपाळ , बनवला असा मास्टरप्लॅन की..

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एक महिला साडीचा आधार घेऊन तुरुंगातून पळून गेलेली आहे. महिला कैदी तुरुंगातून पळून गेल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ माजलेली असून उत्तराखंड येथील हे प्रकरण आहे. सदर महिला ही नेपाळची असून तिचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. अमली पदार्थ विक्री प्रकरणात पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

उपलब्ध माहितीनुसार , अनुष्का असे तुरुंगातून पळून गेलेल्या महिलेचे नाव असून तिचे वय 25 वर्षे आहे. अमली पदार्थ पुरवल्याच्या आरोपाखाली तिला ताब्यात घेण्यात आलेले होते. नशेची तस्करी करताना ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तिची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली होती. रविवारी सकाळी चारच्या सुमारास साडीच्या सहाय्याने महिला पळून गेलेली आहे.

उत्तराखंड राज्यातील पिथोरागड येथील हे प्रकरण असून एसपी लोकेशवर सिंह यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलताना , ‘ महिला विचाराधीन कैदी होती म्हणजेच लवकरच तिच्या प्रकरणाचा निकाल लागणार होता मात्र त्या अगोदरच ती फरार झालेली आहे. तिला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथकाने कंबर कसलेली असून ती नेपाळच्या थार जिल्ह्यातील रहिवासी आहे ‘, अशी माहिती दिलेली आहे.


Spread the love