सोशल मीडियावर सध्या एका महिलेची जोरदार चर्चा सुरू असून या महिलेने नवजात बाळाला चक्क दारू पाजलेली आहे. कोणत्याही आईसाठी तिचे बाळ हे तिच्या प्राणापेक्षा प्रिय असते मात्र या आईने जन्मजात बाळाला रडणे थांबवण्यासाठी चक्क दारू पाजलेली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील हे प्रकरण असून या महिलेची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार , महिलेचे वय 37 वर्ष असून तिचे नाव ऑनस्टीला असे आहे . सतत रडून हे बाळ तिला हैराण करत होते म्हणून तिने दुधाच्या बाटलीत दारू भरली आणि त्यानंतर बाळाला ती पाजली . दारू पाजल्यानंतर बाळ काही काळ शांत झाले मात्र अखेर त्याला त्रास होऊ लागला आणि ते मरणाच्या दारात जाऊन पोहोचले . पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केलेली आहे.
अटक केल्यानंतर महिलेने सातत्याने रडून बाळ मला त्रास देत होते म्हणून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता म्हणून मी त्याला दारू पाजली मात्र त्याचे परिणाम असे होतील याची मला कल्पना नव्हती असे सांगितले आहे. महिलेच्या या प्रकारानंतर जखमी झालेल्या बाळाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेले असून महिलेला डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आलेले आहे.