सोशल मीडियावर सध्या मध्यप्रदेशातील इंदोर येथील एका ब्लॅकमेल प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका आयटी इंजिनियरला फेसबुकवर अअनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट चांगलीच महागात पडलेली आहे. तरुणाचे यामध्ये पैसे तर गेलेले आहेत सोबत त्याची सामाजिक बदनामी देखील मोठ्या प्रमाणात घडलेली आहे . हजारो तरुण अशाच पद्धतीने रोज हनीट्रॅपच्या सापळ्यात अडकत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , अग्रवाल असे या इंजिनिअरचे नाव असून फेसबुकवर त्याला एका अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती . प्रोफाईलला सुंदर फोटो पाहिल्यानंतर तो भाळून गेला आणि त्याने तिच्याकडे मोबाईल नंबर मागितला त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांच्यात मोबाईलवर चॅटिंग देखील होत असायचे याच दरम्यान मुलीने त्याला व्हिडिओ कॉल केला आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःचे सगळे कपडे काढून टाकले. तिला नग्न पाहिल्यानंतर तरुणाचा देखील स्वतःवर ताबा राहिला नाही.
आरोपी तरुणीने त्याला ‘ अशाच पद्धतीने तू देखील करून दाखव ‘ असे सांगितले त्यानंतर त्याने तिच्यासमोर तसा प्रकार केला मात्र त्याने तिला चेहरा दाखवला नाही आणि पाच सेकंदात त्यानंतर तिने कॉल डिस्कनेक्ट केला यापुढील काळात देखील असाच प्रकार सुरू झाला आणि त्यानंतर तरुणीने अखेर त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि त्याला ब्लॅकमेल करायला सुरु केले.
एके दिवशी या तरुणाला आपण गुन्हे शाखेचे अधिकारी राकेश अस्थाना आहोत असा फोन आला आणि त्यानंतर माझ्या विरोधात माझ्याकडे तुझ्या विरोधात तक्रार आलेली आहे तू पैसे दिले नाही तर तुझे व्हिडिओ अपलोड केले जातील अशा पद्धतीने त्याला त्रास देण्यास सुरू झाले . हतबल झालेल्या या तरुणाने तीस हजार रुपये जमा केले मात्र पुन्हा अशाच पद्धतीने सातत्याने पैसे मागितले जाऊ लागल्यावर त्याला शंका आली आणि अखेर त्याने वकिलांशी संपर्क साधला आणि सोमवारी पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांच्याकडे संबंधित मोबाईल नंबर आणि स्क्रीन शॉट देऊन तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नयेत सोबतच अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट टाळाव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.