महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत समोर आलेले असून एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पंढरपूरच्या एका कंत्राटी एसटी चालकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केलेला आहे. बार्शीला आल्यानंतर तो तिला भेटायचा आणि त्यानंतर आता अखेर तिचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन तो पसार झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विकास पांडुरंग पाटील ( वय 26 वर्ष राहणार शेवते तालुका पंढरपूर ) असे संशयित कंत्राटी एसटी चालकाचे नाव असून मे 2022 पासून तर 4 ऑगस्ट 2023 पर्यंत वारंवार ही घटना घडलेली आहे. पंढरपूर इथून रोज बसने जाणे येणे असल्या कारणाने महिलेची कंत्राटी चालक म्हणून काम करणारा विकास पाटील याच्यासोबत ओळख झालेली होती.
ओळख झाल्यानंतर काही दिवसातच त्याने तिचा फोन नंबर घेतला आणि त्यानंतर सोशल मीडियावर तो तिच्यासोबत संपर्कात राहू लागला . ‘ मला तू खूप आवडतेस तू माझ्याशी लग्न कर ‘ असे असा देखील तो तिला आग्रह करत असायचा. पीडित महिलेने त्याला माझा लग्न झालेले असून मला दोन मुले आहेत असे सांगितले मात्र तरी देखील त्याने तिच्यासोबत वारंवार संपर्क केला आणि पंढरपूर बार्शी तसेच इतर ठिकाणी देखील तिला लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. चार ऑगस्ट रोजी त्याने तिच्यावर अत्याचार अत्याचार केला आणि त्यानंतर तिचे मंगळसूत्र कानातले आणि पैंजण घेऊन फरार झाला. सध्या तो फोन उचलत नाही असे पीडित महिलेचे म्हणणे असून पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पुढील तपास करत आहेत.