मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यानंतर त्याचा वापर करत सेक्स व्हिडिओ बनवून त्याच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून असाच एक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात समोर आलेला आहे. आरोपींच्या धमक्यांना घाबरून अखेर या तरुणाने गळफास घेतलेला असून नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील ही घटना आहे . अज्ञात व्यक्तीच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मयत तरुणाचे वय अवघे 24 वर्ष असून एका व्यक्तीने आपण दिल्ली येथे पोलीस म्हणून कार्यरत आहोत असे सांगत समाज माध्यमात अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी त्याला देत त्रास देणे सुरू केलेले होते. पीडित तरुणाने सुरुवातीला 38 हजार 39 हजार रुपये संबंधित व्यक्तीच्या फोन पे अकाउंट मध्ये देखील पाठवले मात्र सातत्याने त्याला त्रास दिला जात असल्याकारणाने चार ऑगस्ट रोजी त्याने गळफास घेतलेला होता.