‘ सॉरी स्नेहल वहीतील मजकूर ‘ , असे लिहून ठेवत तरुणीने अखेर..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात समोर आलेली असून डीएडला दुसऱ्या वर्गात शिकत असलेली मुलगी हिने जिन्यातील लोखंडी ग्रीलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून त्यानंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सात ऑगस्ट रोजीची ही घटना असून सायली सुदाम कदम ( वय 20 राहणार भूम जिल्हा उस्मानाबाद सध्या राहणार भगवंत कॉलनी कासारवाडी रोड बार्शी ) असे मयत तरुणीचे नाव असून तिची मैत्रीण असलेली स्नेहल हिने बार्शी शहर पोलिसात या प्रकरणी खबर दिलेली आहे.

सायली आणि स्नेहल या डीएडच्या दुसऱ्या वर्गात शिकत होत्या आणि कासारवाडी रोड इथे शिक्षणासाठी भाड्याने एका खोलीमध्ये राहत होत्या . सकाळी ११ च्या सुमारास सायली हिला स्नेहलने तू आज नाराज का आहेस ? असे विचारले होते मात्र तिने काहीही उत्तर दिले नाही . त्यानंतर तिने स्नेहलच्या मोबाईलवर ‘ सॉरी स्नेहल प्लीज वहीतील मजकूर घरच्यांना दे ‘ असा मेसेज केला

तिचा मेसेज वाचल्यानंतर तिची मैत्रीण गडबडून गेली आणि तिने तिला फोन केला मात्र तिने फोन उचलला नाही शिवाय दरवाजा देखील आतून बंद होता त्यानंतर अखेर तिने परिसरातील नागरिकांना माहिती दिली आणि लोकांनी दरवाजा तोडला त्यावेळी तिने गळफास घेतलेला होता . स्नेहलने तिच्या नातेवाईकांना बोलावून हा प्रकार सांगितलेला असून फिर्यादी मुलीने पोलिसात याप्रकरणी खबर दिलेली आहे.


Spread the love