महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर इथे काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती . नागपूर येथील भाजपच्या पदाधिकारी असलेल्या सना खान यांची हत्या झाल्याचे अखेर समोर आलेले असून याप्रकरणी मुख्य आरोपी संशयित आरोपी असलेला अमित उर्फ पप्पू साहू नावाच्या एका गुंडाला नागपूर पोलिसांनी अखेर मध्यप्रदेशात जाऊन अटक केलेली आहे. त्याने सना खान यांच्या हत्येची कबुली देखील दिलेली आहे. पप्पू याला सना खान यांनी एक सोन्याचे लॉकेट दिले होते ते गायब असल्याचे व्हिडीओ कॉलवर त्यांच्या लक्षात आले आणि वाद वाढला होता.
उपलब्ध माहितीनुसार , सना खान या नागपुर येथील भाजपच्या पदाधिकारी असून गेल्या आठ दिवसांपासून त्या गायब झालेल्या होत्या. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना मध्यप्रदेशातील एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप पप्पूवर करण्यात आलेला होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अमित साहू याच्यासोबत सना खान यांनी विवाह देखील केलेला होता. नागपूर पोलिसांनी अखेर जबलपूरला पोलीस पथक रवाना तपासासाठी पाठवलेले होते .
जबलपूर येथील स्थानिक पोलिसांनी आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तपणे आरोपीला अटक केलेली असून पप्पू साहू उर्फ अमित साहू याचा सना खान यांच्यासोबत विवाह झालेला होता मात्र लग्नानंतर त्यांच्यात पटत नसल्याने आरोपीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती असून पप्पू साहू यांच्या नोकराला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे . त्याने पप्पू साहू याच्या गाडीमधून रक्ताचे डाग धुवून काढल्याची कबुली दिलेली आहे.
सना खान या नागपूर पश्चिम महिला भाजप पदाधिकारी असून मागील आठ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या होत्या. जबलपूर येथील एका व्यक्तीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली होती त्यानंतर एक ऑगस्टपासून त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या आईने मानकापूर पोलिसात केली . दरम्यानच्या काळात जबलपूर इथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला त्यावेळी हा मृतदेह सना खान यांचा असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि अखेर आरोपीला जेरबंद केलेले आहे.