अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यावर जीव घेणारच होता पण..

Spread the love

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आलेले असून पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार आता जळगाव जिल्ह्यातच पारोळा तालुक्यात समोर आलेला आहे . एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला असून त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिचा गळा आवळून तिला मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार . पीडित मुलगी ही 14 वर्षीय असून शौचालयासाठी जात असताना आरोपीने तिला अडवले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर पारोळा पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बारक्या उर्फ अशोक मगा भिल असे आरोपीचे नाव आहे. त्याने रस्त्यात तिला अडवत तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर दोरीने तिचा गळा आवळून तिच्या डोक्यात दगडाने मारत तिला ठार करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने ती यामध्ये वाचलेली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पीडित मुलीच्या भावाने पारोळा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आरोपीच्या विरोधात 307 376 354 323 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी पारोळा पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. पोलिसांनी आरोपी नराधमाला तात्काळ अटकही केलेली आहे.


Spread the love