महाराष्ट्रात सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून अनेकदा पोलिसांच्या तपासाला देखील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामुळे मर्यादा येत आहेत मात्र सांगली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सध्या सोशल मीडियात जोरदार कौतुक केले जात असून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका टोळीवर कठोर कारवाई करत या टोळीचे बँकेतील तब्बल पावणेआठ कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , संबंधित टोळी ही ऑनलाईन फसवणुकीचे रॅकेट चालवत होती त्यामध्ये टास्क फ्रॉड सोबतच गुंतवणुकीचे फ्रॉड अशा वेगवेगळ्या मार्गांनी त्यांनी अनेक नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढलेले होते . अशाच पद्धतीने अखेर त्यांनी हजारो लोकांची फसवणूक केली त्यानंतर या टोळीचा पापाचा घडा भरला आणि पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यातील पैसेच अखेर गोठवलेले आहेत.
आरोपी हे टेलिग्रामच्या माध्यमातून जाहिरात करून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर टेलिग्राम ग्रुपमध्ये समाविष्ट करून त्यांना दुप्पट पैशाचे आमिष दाखवायचे . आत्तापर्यंत वेगवेगळ्या सत्तावीस बँकांमधील तब्बल सात कोटी 81 लाख आता गोठवण्यात आलेले आहेत अशी माहिती सांगलीचे पोलीस अध्यक्ष बसवराज तेली यांनी दिलेली आहे.
आरोपींनी इस्लामपूर येथील एका व्यक्तीला अशाच पद्धतीने फसवलेले होते . ग्रुपवर त्यांना ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यात गुंतवणूक करण्यास भाग पाडलेले होते. आत्तापर्यंत या व्यक्तींनी या व्यक्तीने 21 लाख दहा हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात भरले होते मात्र फसवणूक झाल्याची जाणीव होताच इस्लामपूर पोलिसात त्यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी देखील तात्काळ सूत्रे हलवत अखेर कारवाई केलेली आहे.