देशात एक खळबळजनक असा प्रकार उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात समोर आलेला असून एका अल्पवयीन मुलासोबत तीन वर्ष जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पीडित परिवाराने पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र अखेर कोर्टाने आदेश दिल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
अमेठी जिल्ह्यातील एका गावातील ही घटना असून एका अल्पवयीन मुलाला त्याच्या नात्यातील एका महिलेने गोड गोड बोलून सोबत नेलेले होते त्यानंतर तब्बल तीन वर्ष त्याचे लैंगिक शोषण करत तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. काही काळ उलटल्यानंतर मुलाच्या परिवारांना याबद्दल माहिती समजली म्हणून त्यांनी कसेबसे करून महिलेच्या तावडीतून मुलाची सुटका केली मात्र पोलिसात जाऊन देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.
अल्पवयीन मुलगा महिलेच्या तावडीतून सुटलेला असला तरी त्याला अद्यापपर्यंत ही महिला फोन करून शारीरिक संबंधासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती. जर असे केले नाही तर तुला खोट्या गुन्हा अडकवेन अशी देखील ती सांगायची. कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती झाली आणि त्यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून पीडित परिवार कोर्टाकडे पोहोचलेला होता. कोर्टाने आता चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत मात्र तरी देखील अद्यापपर्यंत कोर्टाचा आदेश आलेला नाही असे कारण देत पोलीस टाळाटाळ करत आहेत.