15 ऑगस्टला डॉक्टरांचा सत्कार होणार होता पण त्याआधीच..

Spread the love

15 ऑगस्टच्या दिवशी एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली असून अंजनविहिरे इथे डॉक्टर व्ही आर पाटील यांनी तापी नदीच्या पुलावरून उडी मारून टोकाचे पाऊल उचलले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सन्मान होणार होता मात्र त्याआधीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे नागरिकांना देखील धक्का बसलेला आहे.

15 ऑगस्ट रोजी डॉक्टर व्ही आर पाटील यांनी तापी नदीच्या पुलावर त्यांची कार लावली त्यानंतर कारमधून खाली उतरले आणि पुलावरून उडी मारून दिली . धरणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी डॉक्टरांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांनी जप्त केलेली आहे . जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानासाठी निघालेले असतानाच त्यांनी हा प्रकार केलेला आहे . त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.


Spread the love