देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना हिमाचल प्रदेश इथे उघडकीस आली आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि मास्टरप्लॅनमुळे या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे . सदर आरोपी हा सोशल मीडीयावर फेक आयडी तयार करून महिला आणि मुलींना अश्लील मेसेज पाठवत होता त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्याच ट्रिकचा वापर केला.
हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील एका महिलेला या आरोपीने अश्लील मेसेज पाठवले तेव्हा या महिलेने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. सदर तक्रार ही गेल्या महिन्यात आयटी अॅक्ट अन्वये दाखल झाली होती आणि त्याच्या तपासाची जबाबदारी इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांच्याकडे सोपवण्यात आली होती. जिल्हा पोलिसांच्या आयटी सेलचे प्रभारी इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांनी कुख्यात आरोपीला पकडण्यासाठी असा सापळा रचला की ज्यामुळे आरोपी स्वत:च अमृतसरहून मंडीपर्यंत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांनी या तरुणाला पकडण्यासाठी तक्रारदारा महिलेलाच हत्यार बनवण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीशी ओळख वाढत महिलेच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीला मंडी येथे येण्यास सांगितले. महिलेला भेटण्यास मिळणार या आतुरतेने सदर तरुण अमृतसर येथून मंडी येथे आला तेव्हा पोलिसांचे पथक त्याच्या स्वागतासाठी आधीच हजर होते. त्याची धुलाई करत त्याची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.