पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नात्याला काळीमा फासत आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एका नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केलेले आहेत . मुलीने दिलेला तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.
पारगाव पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पीडित अल्पवयीन मुलगी राहते . तिचे वय सतरा वर्ष असून ती इयत्ता अकरावीमध्ये शिकते . मुलीची आई मयत झालेली असून तिचे वडील शेती करतात . मुलगी घरी एकटेच असल्याचे पाहिल्यानंतर नराधम बापाने मे 2023 पासून तर जुलै 2023 पर्यंत वारंवार तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलीने आपल्या बापाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिला चाकूने जिवे मारण्याची धमकी दिली. वडिलांचे असे वर्तन पाहून घाबरून मुलगी गप्प राहत होती मात्र अखेर तिने तिच्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली त्यानंतर मैत्रिणीने तिच्या नातेवाईकांना ही गोष्ट सांगितल्यानंतर अखेर पारगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांनी मुलीसोबत संवाद साधत तिला बोलते केलेले असून नराधम बापाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.