‘ झिंगूरसा सचिन ‘ म्हणणाऱ्या भाभीवर कारवाई होणार ? सीमा म्हणतेय की..

Spread the love

पाकिस्तानमधून सीमा हैदर ही सचिन मीना नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर चार लेकरांसह भारतात दाखल झालेली होती . सध्या ती नोएडा इथे राहत असून त्यांच्या प्रेमप्रकरणाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे सोबतच त्यांच्यावर टीका करणाऱ्या एका महिलेची देखील जोरदार चर्चा सोशल मीडियात असून मिथिलेश भाटीया असे या महिलेचे नाव आहे.

मिथिलेश भाटीया यांनी सचिन याच्यावर टीका करताना ‘ लप्पू सचिन झींगुरसा लडका ‘ असे म्हटलेले होते . सोशल मीडियात त्यांची देखील जोरदार चर्चा असून सचिन याची पत्नी सीमा हैदर हिने मिथिलेश भाटिया यांच्यावर मानहानी प्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला आहे. सीमा हैदरचा नवरा असलेला सचिन याला मिथिलेश लप्पू आणि झिंगुर असे म्हटल्याने आपल्या पतीचा अपमान झालेला आहे असे सीमा हैदर हिचे म्हणणे आहे.

सीमा हैदर हिचे वकील एपी सिंह यांनी याप्रकरणी बोलताना , ‘ सचिनबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल या महिलेला प्रत्येक पतीकडून उत्तर मिळेल . तिची ही टिप्पणी म्हणजे सर्व पतींचा अपमान आहे . त्वचेचा रंग आणि शारीरिक दोषांच्या आधारे केलेला अपमान आपल्या देशात सहन केला जाऊ शकत नाही ‘ असे म्हणत कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिलेला आहे.

मिथिलेश भाटिया यांनी याप्रकरणी बोलताना , ‘ मी कुणाचाही अपमान केलेला नाही. मला राग आला आणि माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले . सहसा आपली अशी भाषा आपल्या बोलीभाषेत वापरली जाते . लोक मला लप्पी म्हणतात याचा अर्थ मी लगेच लप्पी होईन असा नाही ‘, असे देखील त्यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलेले आहे.


Spread the love