पोलिसांना फोन करून म्हणाला की.., गुजरातमध्ये आरोपी ताब्यात

Spread the love

संपूर्ण देशात सध्या फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून मोठ्या नावाचा वापर करून देखील रोज नवनवीन फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना गुजरातमध्ये समोर आलेली असून गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाचा मी अधिकारी आहे असे सांगून जामनगरच्या पोलीस अधीक्षक यांना एका आरोपीला सोडण्यास सांगणाऱ्या तोतया व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 10 ऑगस्ट रोजी जामनगरचे पोलीस उपाधीक्षक प्रेमसुख देलू यांच्या मोबाईलवर आरोपीने व्हाट्सअप कॉल केलेला होता त्यावेळी त्याने आपण सीएमओ ऑफिसचा अधिकारी आहोत असे सांगितले सोबतच सायबर क्राईमशी संबंधित एका व्यक्तीला तुम्ही अटक केलेली आहे तात्काळ त्याची सुटका करा असे देखील तो म्हणाला.

पोलीस उपाधीक्षक यांना फोन आल्यानंतर ज्या नंबरवरून कॉल आलेला होता त्या नंबरची शहानिशा केली त्यावेळी सीएमओ ऑफिसच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा हा नंबर नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यानंतर पटेल नावाच्या एक व्यक्तीला अहमदाबाद इथून ताब्यात घेतलेले असून त्याला जामनगरला आणण्यात आलेले आहे. सायबर गुन्ह्यातील आरोपी अमीर असलम याची सुटका करण्यासाठी त्याने हा फोन केलेला होता . भारतीय दंड संहितेच्या आयपीसी कलम 170 प्रमाणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love