महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या मुंबईतील मिरा रोड परिसरात समोर आलेली असून एका मुस्लिम कुटुंबीयांनी दत्तक घेतलेल्या तीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रकरण इतक्यावर न थांबता सतरा वर्षीय मुलीवर एकोणीस वर्षाच्या मामाने बलात्कार केल्याचा देखील प्रकार घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने धर्मांतरासाठी आपल्यावर दबाव टाकला जात होता असा आरोप केलेला आहे.
सदर प्रकरणी आतापर्यंत तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली असून पीडित अल्पवयीन मुलगी ही सतरा वर्षाची वर्षांची आहे. मुंबईतील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. कोरोना काळात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जानेवारी महिन्यात आईने देखील आत्महत्या केली . पीडित मुलगी आणि तिचे दोन भाऊ एका अनाथ आश्रमात राहत होते.
मुंबईतील मिरा रोड परिसरात राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबीयांनी पीडित मुलगी आणि तिच्या दोन्ही भावांना दत्तक घेतले . आठ ऑगस्ट रोजी दत्तक घेतलेली मुलगी या कुटुंबात असताना 19 वर्षीय आरोपी याने घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने मीरा रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकरण संवेदनशील असल्याने कॅमेऱ्यासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे .