रिक्षात शेजारी ‘ हमजा ‘ येऊन बसला , पीडित मुलगी म्हणतेय शेजारी बसताच ..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापूर इथे समोर आलेला असून रिक्षामधून कॉलेजला जात असताना सोळा वर्षांच्या मुलीच्या शेजारी बसून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी आणि तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हमजा अब्दुल माजीद शेख ( राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित मुलगी ही शनिवारी दुपारी रिक्षामधून जात असताना आरोपी तिच्या शेजारी येऊन बसलेला होता सुरुवातीला त्याने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून त्याने तिचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने तिचा मोबाईल हातात घेतला आणि स्वतःच्या नंबरवर फोन करून तिचा नंबर मिळवला त्यानंतर पीडित मुलीने ही घटना आपल्या मैत्रिणींना सांगितली त्यानंतर तिच्या मैत्रिणींनी आरोपीला कॉलेजजवळ बोलावले होते मात्र तिथे बऱ्याच मैत्रिणी पाहिल्यानंतर आरोपी पळून गेला त्यानंतर ही घटना मुलीने वडिलांना सांगितली आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love