दुसऱ्या बायकोच्या त्रासाला वैतागून आधी घर सोडलं अन.., पुण्यातील घटना

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर वर्षभरातच एका व्यक्तीने दुसरे लग्न केले मात्र घर नावावर करून देण्यासाठी या पत्नीने पतीचा इतका काही छळ केला की अखेर छळाने त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विलास गेनबा लगड ( वय 62 राहणार लक्ष्मी कॉलनी विठ्ठल नगर हडपसर ) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव असून गळफास करत असल्याचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवलेला होता . त्यांचा मुलगा सागर याने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून सुजाता गुरव ( वय 50 ) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हडपसरमधील 15 नंबर चौक येथे किंग लॉज येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली असून विलास लगड यांच्या पहिल्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे त्यानंतर त्यांनी सुजाता गुरव हिच्यासोबत लग्न केलेले होते. फिर्यादी व्यक्ती यांनी तिला वरच्या मजल्यावर राहण्यास फ्लॅट देखील दिलेला होता . काही दिवसांनी सुजाता हिने घर नावावर करण्यासाठी विलास यांना त्रास देण्यास सुरू केला.

सुजाता हिच्या त्रासाला वैतागून अखेर विलास लगड हे मे 2023 मध्ये घरातून निघून गेलेले होते. त्यांच्या मुलांनी त्यांचा शोध घेतला आणि अखेर त्यांना पुन्हा शोधून परत आणल. घर नावावर करून देण्यावरून याआधी देखील कुटुंबात अनेकदा वादावादी झालेली असून विलास यांनी अखेर लॉजवर जाऊन गळफास घेतला . मोबाईलमध्ये त्यांनी सुजाता हिच्या त्रासाला वैतागून आपण आत्महत्या करत आहोत. माझ्या मृत्यूला फक्त सुजाता गुरव हीच जबाबदार आहे अशी चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे आणि एक व्हिडिओ देखील त्यांनी यासंदर्भात बनवलेला आहे.


Spread the love