महाराष्ट्र हादरला..सासऱ्याचा सुनेवर दोनदा बलात्कार

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावतीत समोर आलेली असून चुलत सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याचा प्रकार आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 ऑगस्ट रोजी समोर आलेला आहे. सदर घटना ही आठ ऑगस्ट रोजी घडलेली होती मात्र पीडित महिला ही घाबरून गेलेली असल्याकारणाने 16 ऑगस्ट रोजी 39 वर्षीय सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , आठ ऑगस्ट रोजी सकाळी वीस वर्षीय विवाहित महिला आणि तिचा आजा सासरा हे दोघेच घरी असताना आरोपी चुलत सासरा हा तिच्या घरी पोहोचलेला होता. त्याने तिला घरी कोणी नाही का ? अशी विचारणा केली त्यानंतर तिने बाकीचे सर्व शेतात गेलेले आहेत. मी आणि माझे आजे सासरे आम्ही दोघेच घरात आहोत असे सांगितले.

आरोपी चुलत सासऱ्याने त्यानंतर तिच्यावर दोनदा अत्याचार केला . सदर प्रकरण कोणाला सांगशील तर तुला आणि तुझ्या सासऱ्यांना मारून टाकेल अशी देखील त्याने धमकी दिली. दरम्यानच्या काळात पीडित महिलेचा पती तिथे आला त्यामुळे आरोपी तेथून निघून गेला . पुन्हा एकदा आरोपी तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने आलेला होता मात्र पती घरात असल्याने आरोपी तिथून पळून गेला. पीडित महिलेने अखेर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.


Spread the love