‘ गोल्डन भुरा ‘ साठी ती बनायची सना खान , मुंबईतील तुरुंगात जायची अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून आंतरराष्ट्रीय ड्रग खरेदी आणि विक्री करणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केलेला आहे. तब्बल 71 लाखांचे ड्रग्स जप्त करण्यात आलेले असून एका महिलेसह तब्बल नऊ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केलेली आहे.

सदर प्रकरणातील ड्रग्ज माफिया असलेला सरफराज शाबिर अली खान उर्फ गोल्डन भुरा हा आर्थर रोड कारागृहात असताना त्याच्या भेटीसाठी प्रियंका अशोक कारकुर ही चक्क सना साबीर अली खान या बनावट आधार कार्डचा वापर करून आपल्या प्रियकराला मदत करत होती . तिच्याकडे दोन आधार कार्ड सापडलेले असून भुरा कारागृहात असताना ती सना नावाने आधार कार्ड घेऊन त्याला भेटायला जायची. प्रियंका ही डान्सबारमध्ये काम करत असायची

डान्सबारमध्ये आरोपी भुरा हा आलेला असताना तिला पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला . 2018 पासून त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते त्यानंतर प्रियंका ही देखील त्याच्या ड्रग्सच्या धंद्यात सक्रिय झाली आणि या विक्रीतून येणारी रक्कम ही प्रियंका हिच्या चेंबूरच्या घरात ठेवण्यात येत असायची. कारवाई झाली त्यावेळी तिच्या घरात देखील सतरा लाख रुपयांची रोकड आढळून आलेली आहे. मुलुंड टोल नाका परिसरात तीन कार अडवून ही कारवाई करण्यात आलेली होती.


Spread the love