अवघ्या सतरा वर्षाच्या मुलावर लांडग्यासारखे तुटून पडले , महाराष्ट्रातील घटना

Spread the love

राजकीय कुरघोडीत बहुतांश मंत्री अडकून पडलेले असून त्यामुळे महाराष्ट्राला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत असून कल्याण पूर्व भागात एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे. अवघ्या 17 वर्षीय मुलाची गाठून सुमारे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हत्या केलेली आहे . खडे गोलवली भागातील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , समीर लोखंडे ( वय 17 वर्ष ) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून दहा ते बारा जणांचे टोळके अक्षरशः लांडग्यासारखे त्याच्यावर तुटून पडले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. शुक्रवारी ही घटना घडलेली असून शुल्लक कारणावरून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी काही संशयित तरुणांना अटक केलेली आहे.

समीर याच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्याच्या आईने मोठ्या प्रमाणात आरडाओरड केली तेव्हा काही नागरिकांनी एका आरोपी तरुणाला पकडत पोलिसांच्या हवाली केलेले होते. भरवस्तीत हा प्रकार घडल्यानंतर नागरिक एकवटले आणि त्यांनी समीर याला वाचवण्याचा प्रयत्न केला सोबतच आरोपी तरुणाला देखील पकडण्यात त्यांना यश आले मात्र बेदम मारहाण केल्यानंतर समीर याचा त्यानंतर मृत्यू झाला.


Spread the love