महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या सोलापूर शहरात समोर आलेले असून आईसोबत वाद झाल्यानंतर एका तेरा वर्षीय मुलीने राहते घर सोडलेले होते त्यानंतर शहरातील होम मैदान परिसरात ती थांबलेली असताना एका व्यक्तीने तिला पुण्याला जॉब देतो असे सांगत सोबत घेतले आणि तिच्यावर पुण्यात नेऊन अत्याचार केला सोबतच तिला भीक मागायला लावले अशी फिर्याद तिच्या आईने पोलिसात दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपी तरुणावर या प्रकरणी बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सुलतान रफिक गोलीवाले ( वय बावीस राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे . त्याच्यावर ॲट्रॉसिटी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पीडित मुलीचा तिच्या आईसोबत वाद झालेला होता त्यामुळे ती आठ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडली.
होम मैदान परिसरात ती थांबलेली असताना तिला आरोपी सुलतान गोलीवाले हा तिथे भेटला आणि त्याने तिला पुण्याला काम देण्याचे आमिष दाखवत रेल्वेने तो तिला पुण्याला घेऊन गेला . तिथे जाऊन आपला विवाह झालेला आहे असे सांगत त्याने तिला नातेवाईकाच्या घरी ठेवले अन त्याच दिवशी त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीला आरोपीचे आधीच लग्न झाल्याची माहिती समजली आणि तिने विचारणा केल्यानंतर आरोपीने आरोपीने तिला इतरत्र नेऊन आपल्या सोबत ठेवले आणि काही कालावधीत पैसे आणून दे असे सांगितले.
पीडित मुलीला आरोपीने अक्षरशः भीक मागण्यास सांगितले आणि त्यानंतर आलेले काही पैसे आरोपीला दिल्यानंतर आरोपी हे पैसे घेऊन दारू पिऊन यायचा आणि तिला शिवीगाळ करायचा. 15 ऑगस्ट रोजी अखेर पीडितेला तो सोलापुर येथे घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने तिथून पलायन केले. पीडित मुलीने आपल्या आईला ही बाब सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.