पुण्यामध्ये आडबाजूला असलेल्या लॉजमध्ये तसेच चक्क फ्लॅटमध्येही वेश्याव्यवसाय सुरू असल्याची अनेक प्रकरणे समोर येत असून पुन्हा एकदा असेच प्रकरण पिंपरीत समोर आलेले आहे. सांगवी इथे एका फ्लॅटमध्ये पैशाचे आम्हीच दाखवत चक्क युगांडा येथील एका महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता . अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत महिलेची सुटका केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , 17 तारखेला ही कारवाई सांगवी इथे करण्यात आलेली असून पोलीस नाईक संगीता रामनाथ जाधव यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी हा पैशाच्या आमिषाने महिलांना वेठीस धरून त्यांच्याकडून चक्क फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय करून घेत होता.