महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जामनेर तालुक्यात समोर आलेली असून एका पस्तीस वर्षीय महिलेला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. जामनेर पोलिसात या प्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पीडित महिला ही जामनेर तालुक्यातील एका गावात राहिला असून राहायला असून आपल्या परिवारासोबत जामनेर तालुक्यातील एका गावात रहायला आहे. तक्रारदार महिलेवर दोन जुलैपासून 25 जुलैपर्यंत जामनेर शहरातील एका ठिकाणी आणि मलकापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाने अत्याचार केलेले आहेत असे महिलेचे म्हणणे आहे. 19 ऑगस्ट रोजी अखेर अत्याचार झाल्याचा दावा महिलेने केला असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
इरफान इस्माईल सय्यद ( वय 25 वर्ष राहणार बोदवड ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरूळे , जामनेर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे.