महाराष्ट्रात एक अजब असा प्रकार मुंबईतील बोरिवली इथे समोर आलेला असून 52 वर्षीय महिलेने घरात हल्ला करणाऱ्या चोरापासून बचाव करण्यासाठी एक अजब शक्कल लढवलेली आहे. चोर घरात शिरल्यानंतर महिलेला घाबरून त्रास झाला आणि त्यात तिला उलटी होऊन त्यात काही रक्त बाहेर आले हे पाहिल्यानंतर चोर देखील गडबडून गेला त्यावेळी तिने मला एड्स झालेला आहे असे चोराला सांगितले त्यानंतर चोर तिथून पळून गेला.
उपलब्ध माहितीनुसार , सदर घटना ही गोराई परिसरातील असून सोसायटीत एक महिला तीस वर्षांपासून राहायला आहे . त्यांचा मुलगा आणि सुनबाई परदेशात कामासाठी असतात आणि त्या स्वतः एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात काम करून आपला उदरनिर्वाह करतात. 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी रात्री दोनच्या सुमारास कसला तरी आवाजाला म्हणून त्यांनी पाहिले त्यावेळी एक 25 ते 30 वर्षांचा तरुण त्यांच्या घरात तोंडाला आणि डोक्याला रुमाल बांधून उभा होता.
तक्रारदार महिला यांनी त्याला तू इथे कशाला आला आहेस असे विचारले त्यावेळी त्याने मी गर्दुल्ला आहे चोरी करायला आलेलो आहे असे सांगितले त्यानंतर महिलेला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला म्हणून महिलेने अखेर त्याला ढकलून दिले आणि घाबरून गेल्याने त्यांना रक्ताची उलटी झाली ते पाहून चोरटा आणखीन घाबरला त्यानंतर त्याने घराच्या दरवाज्यातून बाहेर पडत बाहेरून कडी लावून घेतली आणि तिथून पळून गेला.
तक्रारदार महिला यांनी शेजाऱ्यांना फोन केला आणि दाराची कडी उघडण्यास सांगितले . शेजारी पोहोचले त्यावेळी तक्रारदार महिला देखील चांगल्याच घाबरून गेलेल्या होत्या आणि त्यांची देखील प्रकृती बिघडलेली होती त्यानंतर बोरिवली पोलिसात एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.