‘ तिने फक्त माझा वापर केला अन..’ , चिठ्ठी लिहून ठेवली अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेली असून चंदगड तालुक्यातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून चिठ्ठी लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते . संबंधित मुलीच्या वडिलांना या प्रकरणी माहिती मिळाली त्यानंतर निर्भया पथकाच्या माध्यमातून या तरुणाचे समुपदेशन देखील करण्यात आले मात्र त्यानंतर त्याने काजूच्या झाडाला गळफास घेतला.

उपलब्ध माहितीनुसार , विठ्ठल रोंगाप्पा जाधव ( वय 21 राहणार मलगड ) असे मयत तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती त्यामध्ये त्या मुलीने माझा केवळ वापर केला . निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून परत तिला मेसेज न करण्याची जबरदस्तीने लिहून घेतले आहे मात्र मी तिला विसरू शकत नाही म्हणून मी शेवटचा हा पर्याय निवडलेला आहे आय एम सॉरी ‘, असे म्हटलेले आहे.


Spread the love