देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशात समोर आलेले असून गोड बोलून एका विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर तिच्यासोबत वारंवार अनैतिक संबंध ठेवण्यात आले आणि त्यानंतर अखेर ती गर्भवती झाल्यानंतर तिला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. आरोपीने स्वतःची ओळख लपून ठेवलेली होती असा आरोप महिलेने केलेला आहे.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे , आपल्या पतीचा मृत्यू झालेला असून आरोपी व्यक्तीने ज्यावेळी त्याच्यासोबत ओळख झाली त्यावेळी आपला धर्म लपून ठेवला आणि आपल्यासोबत मैत्री केली. अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात झाली त्यावेळी देखील ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर आरोपीने थातूरमातूर करत वेळ मारून नेली आणि अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेला दिवस गेले आणि त्यानंतर तिला एक मुलगा देखील झाला. आरोपी आता आपल्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत आहे असे देखील महिलेने म्हटलेले आहे. सदर घटना ही उत्तर प्रदेशातील अयोध्याजवळ असलेल्या रुधोउली येथील असून स्थानिक व्यक्तींनी देखील पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार पत्र दिलेले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गावातील एक विधवा महिला दुसऱ्या धर्मातील एका विधवा महिलेच्या तरुणाशी संपर्कात होती. आरोपी तिला गोड बोलून आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून तिचे शारीरिक शोषण करत होता त्यामुळे ती गर्भवती झाली. गर्भवती झाल्यानंतर देखील आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत अशाच पद्धतीने त्याने तिची अनेकदा फसवणूक केलेली असून 17 जुलै रोजी मुलाला जन्म दिल्यानंतर आरोपी आता तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकत आहे असा देखील आरोप करण्यात आलेला असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.