महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना जालन्यात समोर आलेली असून जालना शहरातील सायबर कॅफे प्रेमी युगुलांचे अड्डे बनत चाललेले आहेत. जालना शहरातील एका सायबर कॅफेमध्येच एका प्रेयसीवर नराधम प्रियकराने अनेकदा अत्याचार केल्यानंतर ही प्रेयसी गर्भवती राहिलेली असून आरोपीने त्यानंतर परस्पर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या मात्र त्यानंतर तिची प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयातच तिला सोडून तो फरार झालेला आहे.
एक आठवड्यापूर्वीच जालना शहरात पोलिसांकडून काही सायबर कॅफेवर कारवाई करण्यात आलेली होती त्यावेळचे हे प्रकरण असून पीडित तरुणीचे वय 18 वर्षे आहे . आरोपी तिला सायबर कॅफेमध्ये सोबत घेऊन जायचा आणि आतमध्ये गेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. आरोपी प्रियकराने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आणि त्यातून तिला दिवस गेले म्हणून त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिची तब्येत बिघडली म्हणून एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल केले आणि तिथून तो फरार झाला.
खाजगी रुग्णालयातून या तरुणीला अखेर डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी तिला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने आरोपी प्रियकराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी प्रियकर हा फरार झालेला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना केलेली आहे .