आठवडा उलटला पण ‘ त्या ‘ महिला डॉक्टर अद्यापही गायब

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज परिसरात समोर आलेले असून घरातून निघून गेलेल्या एका महिला डॉक्टरचा शोध पोलीस घेत आहेत मात्र अद्यापपर्यंत त्या मिळून आलेल्या नाहीत. गडहिंग्लज शहरासह तालुक्यात त्यामुळे खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर स्नेहल मेघनाथ महाडिक ( वय 34 राहणार बसर्गे तालुका गडहिंग्लज ) असे गायब झालेल्या महिला डॉक्टराचे नाव असून त्यांचा डॉक्टर कॉलनीत आयुर्वेदिक उपचाराचा दवाखाना आहे. 17 तारखेला त्यांनी सकाळी 11:00 च्या सुमारास आपण गडहिंग्लज इथे चाललेलो आहे असे सांगितले होते मात्र बराच वेळ झाल्यानंतर त्या गडहिंग्लज इथे देखील पोहोचल्या नाहीत आणि रात्री उशिरापर्यंत घरी आल्या नाहीत त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा तपास सुरू केला.

हिरण्यकेशी नदीजवळील जरळी बंधाऱ्याजवळ रस्त्याच्या बाजूला त्यांची दुचाकी दुसऱ्या दिवशी आढळून आली . डिकीमध्ये त्यांची पर्स आढळली असून त्यामध्ये एक चिठ्ठी सापडलेली आहे .पोलिसांनी हिरण्यकेशी नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे मात्र अद्यापपर्यंत त्या मिळून आलेल्या नाहीत. गडहिंग्लज पोलीस उपनिरीक्षक शितल शिसाळ या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे.


Spread the love