देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण हरियाणा इथे समोर आलेले असून एका दिराने त्याच्या वहिनीचा गळा चिरून खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दिराचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते मात्र काही कालावधीनंतर वहिनीचे दुसऱ्या कोणातरी सोबत सुत जुळलेले आहे असा त्याला संशय होता आणि रागाच्या भरात त्याने त्याच्या वहिनीची हत्या केली. हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपी दीर आणि त्याची वहिनी यांच्यात चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते . तिकडाणा गावातील हे प्रकरण असून महिलेच्या नवऱ्याला याप्रकरणी अजिबातही खबर नव्हती. सुमारे चार वर्षांपासून त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू होते मात्र त्यानंतर आपल्या वहिनीचे इतरत्र कुठेतरी प्रेम संबंध सुरू झालेले आहेत असा या दिराला संशय आला आणि त्याने त्यानंतर तिचा खून केला.
दीपक असे या आरोपीचे नाव असून त्याला त्याच्या वहिनीसोबतच संसार थाटायची इच्छा होती त्याने अनेकदा तिच्यासोबत याविषयी बोलणे देखील केलेले होते मात्र महिलेचा पती याला याची कुठलीच खबर नव्हती. दरम्यानच्या काळात त्याच्या वहिनीचे इतरत्र प्रेमसंबंध असल्याची त्याला कुणकून लागली आणि त्यानंतर त्यांच्यात भांडणे सुरू झाली. दीपक याने वहिनीला असे न करण्याचा सल्ला दिला मात्र तिने ऐकले नाही म्हणून अखेर आरोपीने तिचा खून केलेला आहे.
आरोपी दीपक हा महिलेच्या पतीचा चुलत भाऊ लागत असून आरोपीने पोलिसांना आपले चार वर्षांपासून वहिनी सोबत अनैतिक संबंध होते मात्र तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे असा मला संशय आला म्हणून तिला बोलून पाहिले मात्र तिने आपल्याला उलट उत्तरे दिली त्यामुळे भांडण झाल्यानंतर आपण तिचा खून केलेला आहे असे म्हटलेले आहे .